
कुटुंब न्यायालयाच्या घटस्फोटाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या महिलेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले आहे की, पत्नीने पतीशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे आणि त्याच्यावर प्रेमसंबंध असल्याचा संशय घेणे हे क्रूरता आहे. पत्नीच्या वागण्यामुळे पतीला मानसिक त्रास झाला आहे आणि या लग्नात सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता नाही.