Coronavirus :  'या' राज्यात एका दिवसात तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त दारू विक्री

वृत्तसंस्था
Tuesday, 5 May 2020

उत्तर प्रदेशात उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी १०० कोटी पेक्षा जास्त रक्कमेची दारू विक्री झाली आहे.

लखनौ : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे देशभरात मद्यविक्रीलाही बंदी होती. परंतु केंद्र सरकारने काही नियम शिथिल करत दारू विक्रीला कालपासून परवानगी दिली आहे. अशात उत्तर प्रदेशात उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी १०० कोटी पेक्षा जास्त रक्कमेची दारू विक्री झाली आहे. ही दारु विक्री केवळ नऊ तासात झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उत्तर प्रदेशात लॉकडाऊन नसताना दिवसाला सरासरी ७० ते ८० कोटीपर्यंत दारूची विक्री होते. राज्याची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये ६.३ कोटी दारूची विक्री झाली. स्टॉक संपल्यामुळे अनेकांना दुपारनंतर दुकाने बंद करावी लागली आहेत. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात दारू विक्रीला परवानगी मिळताच वेगवेगळयां राज्यांमध्ये दारूच्या दुकानांबाहेर रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. उत्तरप्रदेशमध्येही अनेक ठिकाणी अशा रांगा लागल्या होत्या. 

Coronavirus : दारुवर ७०टक्के स्पेशल कोरोना व्हायरस टॅक्स

दरम्यान, लॉकडाउनमुळे सध्या अर्थचक्र ठप्प आहे. त्यामुळे सगळ्याच राज्यांच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. त्यानंतर सरकारने दारुविक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर दारू खरेदीसाठी दुकानांबाहेर झुंबड उडाल्याने सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाल्याचेही पाहायला मिळाले. दारुच्या दुकानांबाहेर झालेली गर्दी आवरण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना लाठी चार्जही करावा लागला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Booze worth Rs 100 crore sold in UP in 9 hours