Coronavirus : दारुवर ७०टक्के स्पेशल कोरोना व्हायरस टॅक्स

Special Corona Fee Liquor in Delhi to cost 70% more from Tuesday
Special Corona Fee Liquor in Delhi to cost 70% more from Tuesday

नवी दिल्ली : दिल्लीच्या केजरीवाल सरकारने दारुवर स्पेशल कोरोना टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारने दारू विक्रीवर ७०टक्के कोरोना व्हायरस कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. स्पेशल करोना फी अंतर्गत हा कर मंगळवारपासून आकारला जाईल. यानुसार एमआरपीवर ७०टक्के स्पेशल कोरोना टॅक्स आकारला जाणार आहे.

काल (ता. ०४) सोमवारी रात्री उशीरा याबाबतचा आदेश दिल्ली सरकारने काढला. मंगळवारी सकाळपासून हा नियम लागू होईल. दारुच्या दुकानांबाहेर सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्यास तिथे विक्रीला परवानगी देणार नाही, असा इशाराही केजरीवाल सरकारने यापूर्वी दिला आहे. शिवाय, मंगळवारपासून दिल्लीमध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत दारु विक्रीची दुकानं सुरू ठेवायला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे.

लॉकडाउनमुळे गेला महिनाभर देशभरात दारू विक्रीची दुकाने बंद होती. मात्र, सोमवारपासून ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील दारू विक्रीला अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली. त्यानंतर सर्वत्र दारुच्या दुकानांबाहेर तळीरामांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.  त्यांनंतर केजरीवाल सरकारने हा कर लावण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com