सीमाभागात ‘बंकर’मुळे ग्रामस्थ सुरक्षित; आतापर्यंत एवढे खंदक झाले पूर्ण

पीटीआय
Thursday, 3 September 2020

कथुआ, सांबा आणि जम्मू या सीमाभागातील जिल्ह्यांसाठी सरकारने ९५०० बंकर बांधणीस मंजुरी दिली असून त्यापैकी ८ हजार बंकर पूर्ण झाले असल्याची माहिती जम्मू विभागाचे विभागीय आयुक्त संजीव वर्मा यांनी दिली. येत्या काही महिन्यात उर्वरित बंकर पूर्ण होतील, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.  कथुआ जिल्ह्यातील हरीनगर गावातील रहिवासी गुरु राम यांनी गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असल्याचे सांगितले. रात्री-अपरात्री होणाऱ्या गोळीबारामुळे ग्रामस्थांची झोप उडाली होती.

कथुआ - सीमेपलिकडून होणाऱ्या गोळीबारामुळे सीमावर्ती गावातील ग्रामस्थांना जीव मुठीत धरुन राहवे लागते. परंतु राज्य सरकारच्या वतीने बंकरची उभारणी करण्यात आल्याने ग्रामस्थांना भयमुक्त वातावरणात राहवयास मिळत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कथुआ, सांबा आणि जम्मू या सीमाभागातील जिल्ह्यांसाठी सरकारने ९५०० बंकर बांधणीस मंजुरी दिली असून त्यापैकी ८ हजार बंकर पूर्ण झाले असल्याची माहिती जम्मू विभागाचे विभागीय आयुक्त संजीव वर्मा यांनी दिली. येत्या काही महिन्यात उर्वरित बंकर पूर्ण होतील, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.  कथुआ जिल्ह्यातील हरीनगर गावातील रहिवासी गुरु राम यांनी गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असल्याचे सांगितले. रात्री-अपरात्री होणाऱ्या गोळीबारामुळे ग्रामस्थांची झोप उडाली होती. परंतु आता बंकरमुळे पूर्वीच्या तुलनेत अधिक सुरक्षितता वाटत असल्याचे सांगितले. अन्य ग्रामस्थ हरदिप कुमार म्हणाले, की गोळीबार किंवा तोफगोळ्यांचा आवाज आल्यास परिसरातील ग्रामस्थ तातडीने बंकरमध्ये जातात आणि स्वत:ला सुरक्षित करुन घेतात. पूर्वी गोळीबाराचा आवाज येताच आम्ही एखाद्या शाळेत आश्रय घ्यायचो किंवा घरातच लपून बसायचो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गोळीबाराचा आवाज थांबेपर्यंत आम्ही बाहेर पडत नसू. परंतु आता घरातच बंकर तयार केले असल्याने गोळीबारापासून वाचण्यासाठी बाहेर पळत जाण्याची गरज नाही. त्यांची पत्नी ज्योती देवी म्हणाल्या, की बंकरमुळे पूर्वीपेक्षा आम्ही अधिक सुरक्षित झालो आहोत. आमच्या मुली देखील बंकरमुळे स्वत:ला सुरक्षित मानत आहेत. पाकिस्तानकडून सारखा गोळीबार होत असल्याने गावातील ग्रामस्थ हतबल झाले होते. परंतु आता बंकरमुळे ग्रामस्थ निर्भय झाले आहेत. बंकरमध्ये खाटा ठेवता येतात, तसेच स्वयंपाक आणि स्वच्छतागृह उपलब्ध आहे. एकूणातच बंकरमध्ये बराच काळ सुरक्षितपणे राहण्याची सोय सरकारने उपलब्ध करुन दिली.  

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Border area people secure by army bunker