आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधात FIR, हत्येच्या प्रयत्नाचा आरोप

अलीकडेच २६ जुलैला इशान्येकडील आसाम-मिझोराम या दोन राज्यांमध्ये सीमावादावरुन मोठा हिंसाचार झाला होता.
Himanta Biswa Sarma
Himanta Biswa SarmaSakal

कोलकाता: मिझोराम पोलिसांनी (Mizoram) आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्याविरोधात FIR नोंदवला आहे. हत्येचा प्रयत्न (Murder attempt) आणि गुन्हेगारी कट रचणे अशा स्वरुपाचे आरोप आसामच्या मुख्यमंत्र्यांवर ठेवण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांसह आसाम पोलीसचे(assam police) चार वरिष्ठ अधिकारी, दोन नोकरशाह आणि आसाम पोलिस विभागातील २०० अज्ज्ञात व्यक्तींविरोधात FIR नोंदवण्यात आला आहे. (Border row escalates FIR against Assam CM Himanta Biswa Sarma dmp82)

अलीकडेच २६ जुलैला इशान्येकडील आसाम-मिझोराम या दोन राज्यांमध्ये सीमावादावरुन मोठा हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात सात जणांचा मृत्यू झाला होता. मिझोराममधील पोलीस निरीक्षकाने २६ जुलैला एफआयआर नोंदवला असून आयपीसीच्या विविध कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. शस्त्रास्त्र कायदा आणि कोविड रोखण्यासाठी केलेल्या कायद्यातंर्गत FIR नोंदवण्यात आलाय.

Himanta Biswa Sarma
Olympic : कमलप्रीतची फायनलमध्ये धडक, थाळीफेकमध्ये भारताला पदकाची आस

आसामने आपल्या नागरिकांना मिझोराममध्ये जाऊ नका असे सांगितले आहे, त्याचा मिझोरामने निषेध केलाय. "आसाम-मिझोराम सीमावादावर केंद्र सरकारकडून मैत्रीपूर्ण तोडगा निघेल" अशी अपेक्षा मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथंगा यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com