
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.
Boris Johnson : ब्रिटनचे पंतप्रधान थेट 'जेसीबी'वर स्वार
अहमदाबाद (गुजरात) : ब्रिटनचे (British) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Prime Minister Boris Johnson) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज (गुरुवार) सकाळी ते गुजरातच्या (Gujarat) अहमदाबाद विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेतला. सुरूवातीला जॉन्सन यांनी साबरमती आश्रमात भेट देत महात्मा गांधींच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर तिथं चरखा फिरवून सूतही कापलं. या त्यांच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, पंतप्रधान जॉन्सन गुजरातमधील वडोदरा येथील हलोलमध्ये जेसीबी प्लांटचं उद्घाटन करताना दिसले. या उद्घाटनानंतर ते स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांनी सरळ जाऊन जेसीबीच्या ड्रायव्हर सीटवर बसून त्यांनी तिथं उपस्थित असलेल्यांना हात केला. त्यानंतर परत दरवाजावर उभं राहत हात हलवला. त्यामुळं या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन हे आज सकाळीच भारतात पोहोचले. अहमदाबाद विमानतळावर त्यांचं आगमन झाल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी स्वागत केलं. यावेळी अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.
Web Title: Boris On Bulldozer British Pm Hops Onto Iconic Jcb Vehicle At Gujarat Plant Poses
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..