esakal | एकाचवेळी 'त्याने' केलं दोन गर्लफ्रेंडशी लग्न; मग पुढं...
sakal

बोलून बातमी शोधा

एकाचवेळी 'त्याने' केलं दोन गर्लफ्रेंडशी लग्न; मग पुढं...

एका प्रियकराने आपली एक्स गर्लफ्रेंड आणि सध्याची गर्लफ्रेंड या दोघींसोबत चक्क लग्नच केले.

एकाचवेळी 'त्याने' केलं दोन गर्लफ्रेंडशी लग्न; मग पुढं...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : प्रेम प्रकरणामुळे अनेक घटना घडत असतात. लग्न झाले नाहीतर बऱ्याचदा अनेकजण नैराश्येतून आत्महत्या करत असतात. मात्र, उत्तर प्रदेशात एक अनोखी घटना घडली. एका प्रियकराने आपली एक्स गर्लफ्रेंड आणि सध्याची गर्लफ्रेंड या दोघींसोबत चक्क लग्नच केले. या अनपेक्षित अशा प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सध्याच्या युगात बहुतांश तरुण-तरुणींचे अफेअर्सचे असल्याचे दिसत आहे. यातील अनेकांचे एकापेक्षा अधिक तरुण-तरुणीसोबत प्रेमप्रकरण असते. मात्र, जेव्हा एकाच वेळी दोन्ही गर्लफ्रेंड समोर येतात तेव्हा मोठा गोंधळ उडतो. तर अनेकदा बॉयफ्रेंडला चोप दिल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र, उत्तर प्रदेशात अशाचप्रकारे एक बॉयफ्रेंड आपल्या प्रेयसीची लग्न करण्यासाठी मंदिरात पोहचला. तेव्हा त्याच्यासमोर एक्स गर्लफ्रेंड आली. हा प्रियकर आपल्या प्रेयसीला घेऊन लग्न करण्यासाठी मंदिरात आला. तेव्हा त्याची जुनी प्रेयसीही तिथे पोहोचली. तेव्हा गोंधळ उडाला असता प्रियकराने दोघांच्या कपाळी सिंदूर भरला आणि लग्न केले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराजची आहे.

दरम्यान, या प्रकाराचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे याची एकच चर्चा सध्या होत आहे.  
                                                           

loading image