BPSC Sends Legal Notice to Prashant Kishore : बिहार लोकसेवा आयोगाची (BPSC) पूर्व परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेले जन सूरज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बिहार लोकसेवा आयोगाने आता प्रशांत किशोर यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. बीपीएससीवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर आयोगाने ही नोटीस पाठवली. सात दिवसांत प्रशांत किशोर यांनी आयोगावर लावलेले आरोप सिद्ध करावे, असं आयोगाने या नोटीसमध्ये म्हटलं आहे.