B.R Ambedkar Death Anniversary: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंबंधीत 10 रंजक गोष्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 6 December 2020

डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू नगर सैन्य छावणीत झाला होता.

डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू नगर सैन्य छावणीत झाला होता. ते रामजी मालोजी सकपाल आणि भीमाबाई यांचे 14 वे पुत्र होते. आंबेडकरांनी मुंबई विश्वविद्यालयातून बी.ए, कोलंबिया विश्वविद्यालयातून एम.ए, पीएच.डी, एलएल.डी, लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून एमएस.सी,डीएस.सी आणि ग्रेज इनमधून बॅरिस्टरचा अभ्यास केला आहे.

डॉ. आंबेडकरांचे खरे आडणाव अंबावडेकर होते. पण, त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर यांनी त्यांचे नाव शाळेच्या रिकॉर्डसमध्ये आंबेडकर असे टाकले. डॉ. आंबेडकर पहिले असे भारतीय होते ज्यांनी परदेशात जाऊन अर्थशास्त्रातील डॉक्टरेटची पदवी मिळवली होती. ते एकमेव भारतीय आहेत ज्यांची प्रतिमा लंडन संग्राहलयात कार्ल मार्क्स यांच्यासोबत लावण्यात आली आहे. त्यांनी दलित बौद्ध आंदोलनाला प्रेरित केले आणि अस्पृशतेच्या सामाजिक भेदभावाविरोधात अभियान चालवले. डॉ. आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्यायमंत्री, भारतीय संविधानाचे जनक आहेत. 

farmer protest: शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम; कायद्यात सुधारणा करण्याची सरकारची...

आंबेडकरांसंबंधी 10 रंजक गोष्टी

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय तिरंग्यात 'अशोक चक्रा'ला स्थान देण्याचे श्रेय दिले जाते. 

2. अर्थशास्त्राचे नोबेल जिंकलेले अर्थतज्ज्ञ प्रो. अमर्त्य सेन डॉ. आंबेडकरांना अर्थशास्त्रातील त्यांचे गुरु मानतात. 

3. बाबासाहेबांनी लिहिले पुस्तक  “waiting for a visa” कोलंबिया विश्वविद्यालयामध्ये पाठ्यपुस्तक आहे. कोलंबिया विश्वविद्यालयाने 2004 मध्ये जाहीर केलेल्या जगातील आतापर्यंतच्या 100 विद्वानांच्या यादीत आंबेडकराचे नाव होते. 

3. आंबेडकरांची एकूण 64 विषयांमध्ये मास्टरी होती. ते हिंदी, पाली, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, मराठी, पर्शियन आणि गुजरातीसारख्या 9 भाषा जानत होते. याशिवाय त्यांनी 21 वर्षांपर्यंत जगातील सर्व धर्मांचा तुलनात्मकदृष्या अभ्यास केला आहे. 

5. बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये 8 वर्षात संपणारे शिक्षण केवळ 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केले होते. त्यांनी यासाठी दरदिवशी 21-21 तास अभ्यास केला होता. 

6.डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या 8,50,000 समर्थकांसोबत बोद्ध धर्माची दिक्षा घेणे जागतिक इतिहास होता. हे जगातील सर्वात मोठे धर्मांत्तर होते. 

7.बाबासाहेबांना बोद्ध धर्माची दिक्षा देणारे बौद्ध भिक्षू महंत वीर चंद्रमणी त्यांना या युगातील आधुनिक बौद्ध म्हणायचे.

8. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून ''डॉक्टर ऑफ सायन्स''नावाची बहुमुल्य डॉक्टरेट पदवी प्राप्त करणारे बाबासाहेब जगातील पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत. 

9. इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे.

10. दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BR Ambedkar Death Anniversary know 10 intresting facts