

Advanced Brain Tumor Surgery Through Nose Brings Success Government Hospital Doctors Perform Minimally Invasive Procedure
esakal
डोक्याची कवटी न उघडता आणि मोठी चिरफाड न करता नाकाच्या मार्गाने मेंदूतील मोठा ट्युमर काढण्यात लखनौ येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी (सिव्हिल) शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. पिट्युटरी ग्रंथीमध्ये वाढलेल्या ट्युमरमुळे रुग्णाच्या दृष्टीवर परिणाम होत होता. न्यूरोसर्जन डॉ. विनोद कुमार तिवारी यांनी आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाच्या मदतीने हा ट्युमर काढला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या दृष्टीमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती देण्यात आली.