आता नाश्ता महागणार! ब्रेडच्या दरातही झाली वाढ

'या' कारणांमुळं झाली दरवाढ
WhiteBread_Lead
WhiteBread_Lead

मुंबई : पेट्रोल-डिझेल, गॅस सारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीनंतर आता ब्रेडच्या दरातही वाढ झाली आहे. स्लाईस ब्रेडच्या दरात २ ते ५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळं आता सर्वसामान्यांचा नाश्ताही महागणार आहे. सँडविचच्या दरातही यामुळं वाढ होऊ शकते. (Breakfast has also been costlier Now, bread cost in increased in India)

WhiteBread_Lead
Diabetes : 'या' कारणांमुळं लोकांना होतो डायबिटीज, वेळीच व्हा सावध

स्लाईस ब्रेडच्या दरात २ ते ५ रुपयांनी वाढ झाली असून गेल्या पाच महिन्यात ब्रेडच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं यावर्षी खुल्या बाजारात गव्हासाठी विक्री योजना जाहीर न केल्यामुळं मे महिन्यापासूनच ही दरवाढ अपेक्षित होती, त्यानुसार आता ब्रेड महागला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळं इतर सर्वच वस्तूंच्या दरात वाढ होत असते. त्यानुसार, वाढत्या इंधनाच्या किंमती देखील ब्रेडच्या दरवाढीला कारणीभूत ठरली आहे.

WhiteBread_Lead
शिवसेनेची साथ सोडणार नाही; भाजपा खासदार सुजय विखेंचं विधान

दरम्यान, ब्रेडच्या नव्या दरवाढीनुसार सुमारे ४०० ग्रॅम पांढऱ्या ब्रेडची किंमत ३३ रुपयांवरुन ३५ रुपये झाली आहे. तर सॅंडवीचसाठी स्टॉलवर वापरल्या जाणाऱ्या ८०० ग्रॅम ब्रेडची किंमत ६५ रुपयांवरुन ७० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर ब्राऊन ब्रेडची किंमत ४५ रुपयांवरुन ५० रुपये झाली आहे. ब्रेडच्या या दरवाढीमुळं सँडविचच्या दरांवरही परिणामही होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com