BRICS Declaration: ‘ब्रिक्स’ची एकजुटीची हाक; युद्धखोरांना आरसा, नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर

BRICS Calls For Unity As New Delhi Declaration Is Approved: नवी दिल्ली जाहीरनाम्यातून ब्रिक्सची युद्धविरोधी भूमिका ठाम; दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचा पुनरुच्चार, भारताच्या जागतिक नेतृत्वाला पाठिंबा
BRICS Summit New Delhi Declaration Approved As Member Nations Call For Unity Peace And A Fairer Global Order Amid Conflicts

BRICS Summit New Delhi Declaration Approved As Member Nations Call For Unity Peace And A Fairer Global Order Amid Conflicts

sakal

Updated on

नवी दिल्ली : ‘हिंसाचार, सीमेपलिकडील दहशतवाद आणि युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्य केले जाऊ शकत नाही,’ असे सांगणारा  ‘नवी दिल्ली जाहीरनामा’ आज अठराव्या ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशीच प्रसिद्ध करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा  परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या दाव्याला पाठिंबा, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकतर्फी आर्थिक निर्बंधांना विरोध; तसेच  पश्चिम आशियातील संघर्ष थांबविण्यासाठी संयम बाळगण्याचे आवाहन या जाहीरनाम्यात करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com