Crime: लग्नाआधीच वधू पळाली, नंतर बहिणीसोबत लग्न ठरवलं; पण तिचं भलतंच सत्य समोर येताच वर संतापला अन्... थरारक घटनेनं मंडपात खळबळ

Wedding fight viral news: लग्नाआधीच वधू तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. आपली इज्जत वाचवण्यासाठी दोन्ही पक्षांनी तिच्या धाकट्या बहिणीसोबत लग्नाची व्यवस्था केली. पण ऐनवेळी धाकट्या बहिणीचे प्रेमप्रकरणही उघडकीस आले.
Bareilly wedding chaos

Bareilly wedding chaos

ESakal

Updated on

उत्तर प्रदेशातील बरेली येथील बिथ्री चैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी एका लग्नसमारंभात गोंधळ उडाला. लग्नाच्या अगदी आधी वधू तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी, दोन्ही पक्षांनी वधूच्या धाकट्या बहिणीशी लग्न करण्यास परस्पर संमती दर्शवली. परंतु त्यानंतर लगेचच लग्नमंडपात जोरदार हाणामारी झाल्याची माहिती समोर आली. काठ्या आणि विटांच्या मारामारीत तीन जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com