राष्ट्रपतींनी सोडवली नवधूची अडचण...

सकाळ वृत्तसंस्था
बुधवार, 8 जानेवारी 2020

कोचीच्या ताज हॉटेलमध्ये येत्या मंगळवारी एक लग्न होणार आहे. ज्यांची लग्नगाठ बांधली जाणार आहे, ती जोडी अमेरिकन आहे. त्यांनी भारतात लग्न करण्याची तयारी तर केली, पण त्यांच्या लग्नात आलेली समस्या फक्त राष्ट्रपती सोडवू शकत होते आणि त्यांनी ती सोडवली.

कोचीच्या ताज हॉटेलमध्ये येत्या मंगळवारी एक लग्न होणार आहे. ज्यांची लग्नगाठ बांधली जाणार आहे, ती जोडी अमेरिकन आहे. त्यांनी भारतात लग्न करण्याची तयारी तर केली, पण त्यांच्या लग्नात आलेली समस्या फक्त राष्ट्रपती सोडवू शकत होते आणि त्यांनी ती सोडवली.

त्याचं झालं असं, हे अमेरिकन जोडपं मागचे आठ महिने त्यांच्या लग्नाचं प्लॅनिंग करत होतं. त्यांनी डेस्टिनेशन वेडींग करण्याचा निर्णय घेतला आणि कोची येथील ताज हॉटेल लग्नासाठी बुक सुध्दा केलं. पण ऐनवेळी त्यांना सांगण्यात आलं की तुमचं लग्न या ठिकाणी होऊ शकत नाही. त्यासाठी कारण देखील तेवढंच महत्वाचं देण्यात आलं. ते कारण असं होतं की भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे त्या दिवशी त्याच हॉटेलमध्ये राहणार होते. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न येणार होता.

जेव्हा कधी मोठ्या पदावरती असणारी व्याक्ती एखाद्या हॉटेलमध्ये उतरते तेव्हा सुरक्षेच्या कारणांवरुन त्या ठिकणी ठरलेले सर्व कार्यक्रम रद्द केले जातात किंवा दुसरीकडे नेण्यात येतात. यावेळी देखील तेच करण्यात आले. यावर महिलेने त्याविषयी ट्विट करत नाराजी व्यक्त केली. तिने लिहिलं की-

 

कधीतरी तुम्ही आठ महिने खर्चून तुमच्या लग्नाचं प्लॅनिंग करता. तुम्हाला भारतात नावाजलेल्या हॉटेलात डेस्टीनेशन वेडींग करायचं असतं. कधीतरी राष्ट्रपती अचानक लग्नाच्या दिवशी हॉटेलला भेट देतात. मग तुम्हाला अख्खं लग्न नव्याने प्लॅन करण्यासाठी अवघे ४८ तास दिले जातात.

सोनाली कुलकर्णी का भडकलीhttps://www.esakal.com/manoranjan/actress-sonalee-kulkarni-tweets-against-modi-government-jnu-attack-250266

यानंतर त्यांनी राष्ट्रपती कार्यालयाच्या ट्विटर अकांउटला टॅग करत आणखी एक ट्विट केलं ज्यामध्ये त्यामध्ये राष्ट्रपतींच्या सुरक्षा टीमला विनंती केली की, तुम्ही यासंबंधी काही मदत करू शकता का? जेणेकरुन आम्हाला ४८ तासांच्या आत लग्नाचं ठिकाण बदलावं लागणार नाही.

 

त्यानंतर जे घडलं ते खूश करणारं आहे, त्या परदेशी महिलेल्या त्या ट्वीटची ताबडतोब दखल घेण्यात आली. राष्ट्रपतींच्या सुरक्षेवरून लग्नात काही अडचण येणार नाही याची काळजी घेण्यात आली. त्यावर त्या महिलेने आभार मानत ट्विट केलं की, अधिकारी दिवसभर आमच्यासोबत होते. राष्ट्रपतींच्या आर्शीवादानी आमचं लग्न आनंदमयी होईल. 

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यालयातून त्या जोजप्याची अडचण सोडवली गेल्याबद्दल आनंद व्यक्त करत, नवीन जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छादेखील कळवल्या.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bride's problem resolved by the president...