
#Irony हा हॅशटॅग वापरत सोनालीने मोदी सरकारच्या या हिंसक कारभाराला विरोध केला आहे.
मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी (ता. 5) झालेल्या हाणामारीचा निषेध देशभरातून होत असतानाच मराठी कलाकारही हिंसाचाराच विरोध करताना दिसत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ट्विटच्या माध्यमातून हा निषेध व्यक्त केलाय. तिने ट्विट करत मोदी सरकारवर बोचरी टीका केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सोनालीने ट्विटमध्ये म्हणले आहे की, 'स्वतःच्या देशातील विद्यार्थ्यांना वाचवू शकत नाहीत आणि इतर देशांतील अल्पसंख्यांकांना संरक्षण द्यायचे आहे.' तिच्या या सनसनाटी ट्विटमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. तिने केलेल्या या थेट ट्विटमुळे तिचं कौतुकही होतंय. #Irony हा हॅशटॅग वापरत तिने मोदी सरकारच्या या हिंसक कारभाराला विरोध केला आहे.
#boycottchhapaak 'टुकडे-टुकडे गँगसोबत गेलेल्या दीपिकाला ब्लॉक करा'; नेटकरी भडकले
Can’t protect students in your own country and want to protect minorities from other countries!!!! #Irony #JNUViolence #jnuwewithyou
— Sonalee (@meSonalee) January 7, 2020
बॉलिवूड कलाकारही या घटनेचा निषेध करत असून मुंबईतील गेच वेऑफ इंडिया येथे कलाकारांचे आंदोलन झाले. यात नामांकित कलाका, दिग्दर्शक उपस्थित होते. तसेच 'छपाक' गर्ल दीपिका पदुकोननेही काल थेट जेएनयुमध्ये जाऊन जखम विद्यार्थ्यांची व जेएनयुएसयु अध्यक्षा आईशी घोषची भेट घेतली.
JNU Attack:जेएनयूच्या आंदोलनात उतरली दीपिका; जयभीमच्या घोषणा सुरू असतानाच आगमन