Nitin Gadkari News | जोराच्या वाऱ्याने पूल पडला; अधिकाऱ्याच्या कारणाने नितीन गडकरी अवाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari
जोराच्या वाऱ्याने पूल पडला; अधिकाऱ्याच्या कारणाने नितीन गडकरी अवाक

जोराच्या वाऱ्याने पूल पडला; अधिकाऱ्याच्या कारणाने नितीन गडकरी अवाक

बिहारमध्ये बांधकामाधीन असलेल्या एका पुलाचा काही भाग २९ एप्रिल रोजी कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेचं कारण विचारलं असता IAS अधिकाऱ्याने दिलेल्या उत्तराने नितीन गडकरी (Nitin Gadkari) अवाकच झाले. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हा किस्सा सांगितला आहे.

नितीन गडकरी म्हणाले, "२९ एप्रिलला बिहारमध्ये पूल कोसळला. मी माझ्या सचिवाला या दुर्घटनेचं कारण विचारलं. तेव्हा त्याने मला सांगितलं की जोराचा वारा सुटल्याने पूल कोसळला. मला एक समजत नाही, हवेने कसा काय पूल कोसळू शकतो? काहीतरी चूक झाली असणारच."

१७१० कोटी खर्चून उभारला जात असलेला पूल जोराचा वारा सहन करू शकत नसेल तर हा चौकशीचा विषय असल्याचं गडकरींनी म्हटलं आहे. ३११६ मीटर लांबीच्या या पुलाचं काम २०१४ मध्ये सुरू झालं होतं. २०१९ मध्ये ते पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र अजूनही हे काम सुरूच आहे. सुलतानगंजचे आमदार ललित नारायण मंडल यांनी याआधी मुख्यमंत्र्यांनी पूल दुर्घटना प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली होती.

Web Title: Bridge Fell By Strong Gush Of Wind Explained Ias Officer Says Nitin Gadkari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BiharNitin Gadkari
go to top