Brij Bhushan : बृजभूषण यांच्याविरोधात भाजप का पाऊल उचलत नाही? जाणून घ्या 5 कारणं

Brij Bhushan Sharan Singh
Brij Bhushan Sharan Singhesakal

Brij Bhushan Sharan Singh : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर खेळाडूंनी गंभीर आरोप केलेले आहेत. कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. मात्र भाजप बृजभूषण यांच्यावर कुठलीच कारवाई का करत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या अडचणींमध्ये वाढ होतांना दिसत आहे. महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण प्रकरणी दिल्ली पोलिस त्यांच्यावर एफआयआर दाखल करणार आहे. सॉलिसिटर जनरल यांनी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात ही माहिती दिली.

Brij Bhushan Sharan Singh
'रिफायनरीवरुन ठाकरे गटातील आमदार-खासदारांमध्ये मतभिन्नता', अजित पवारांनी उपस्थित केला मुद्दा

बृजभूषण यांच्याविरोधात विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यासह अनेक पैलवान जंतर-मंतरवर सहा दिवासंपासून आंदोलन करीत आहेत. याच पैलवानांनी बृजभूषण यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. कपिल सिब्ब हे या पैलवानांचे वकील आहेत.

बृजभूषण यांच्यावर भाजपने कारवाई न करण्याची पाच कारणं

  • १. बृजभूषण हे तीन वेगवेगळ्या मतदारसंघांमधून खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेलेले आहेत. गोंडा मतदारसंघातून १९९१, १९९८,१९९९ मध्ये ते जिंकले. त्यानंतर ते बलरामपूरधून २००४ मध्ये निवडून गेले. २००९ मध्ये ते केसरगंजमधून खासदार झाले.

  • २. जिथे समाजवादी पक्षाचा दबदबा आहे तिथे भाजप जिंकण्याची तयारी करीत आहे. मैनपुरी, रामपूर, आजमगड, रायबरेली या भागावर बृजभूषण यांचं वर्चस्व आहे.

  • ३. बृजभूषण यांचं राम मंदिर आंदोलनाशी नातं आहे. बाबरी प्रकरणात ते आडवाणी, जोशी, कल्याण आणि उमा भारती यांच्यासह ४० आरोपींमध्ये होते.

  • ४. आडवाणी यांच्या रथयात्रेमध्ये अयोध्या आणि आजूबाजूच्या परिसरात ते सक्रीय होते. १९९१ मध्ये जेव्हा पहिल्यांदा जेव्हा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्यावर ३४ केसेस होत्या. तेव्हा भाजपने त्यांना गोंडाचा रॉबिनहुड म्हणून गौरवित केलं होतं.

  • ५. जर भाजपने बृजभूषण यांच्यावर कारवाई केली तर इतरही खासदारांवर आक्षेप घेतले जावू शकतात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. एडीआरच्या रिपोर्टनुसार २०१९ मध्ये निवडून आलेल्या खासदारांमध्ये २३३ गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत.

  • या कारणामुळे भाजप बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करत नसल्याचं सांगितलं जात आहे. मागील सहा दिवसांपासून आंदोलक बृजभूषण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com