Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

निवडणूक आयुक्तांविरोधातील 'लहरा दो तिरंगा' मोर्चावरून वादंग; स्वतःच्या अटींवर व्यवसाय करण्यासाठी मस्ककडून कट रचल्याचा दावा
"High-alert over 'Lehra Do Tiranga' march in Delhi; Intense debate in political circles."

"High-alert over 'Lehra Do Tiranga' march in Delhi; Intense debate in political circles."

Sakal

Updated on: 

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने (CJP) पुकारलेल्या आंदोलनाला आता धक्कादायक राजकीय वळण लागले आहे. भाजपचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते बृजभूषण शरण सिंह यांनी या संपूर्ण आंदोलनामागे थेट अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्क यांचा हात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. हा देशाविरुद्ध रचलेला आंतरराष्ट्रीय कट असून, केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठीच अशा प्रकारच्या आंदोलनांना फूस लावली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com