Wrestling Federation Of India Election Brij Bhushan Sharan Singh
Wrestling Federation Of India Election Brij Bhushan Sharan SinghESAKAL

Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहचा पाय खोलात! कोर्टानं ७ विविध कलमांतर्गत केली आरोप निश्चिती

पण आपल्यावरील हे आरोप ब्रिजभूषणननं नाकारले आहेत.
Published on

लखनऊ : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह याच्यावर मंगळवारी औपचारिकरित्या आरोप निश्चित केले. कोर्टानं सात कलमांखाली हे आरोप निश्चित केले आहेत. पण आपल्यावरील हे आरोप ब्रिजभूषणननं नाकारले आहेत. (Brij Bhushan Sharan Singh foot in deep court confirmed charge under seven sections)

याप्रकरणी कोर्टानं दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागितलं आहे. त्यामुळं 1 जून रोजी दुपारी 2 वाजता या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. यावेळी ब्रिजभूषणच्यावतीनं त्याच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडली. त्यांनी सांगितलं की, कुस्ती महासंघाचा प्रमुख पदावर कार्यरत असतानाचे त्याचे कॉल डटेल्स आणि परदेश प्रवासाची प्रवासी कागदपत्रे मिळावीत यासाठी त्यानं अर्ज केला आहे.

ब्रिजभूषणच्या वकिलांनी हे देखील सांगितलं की, ब्रिजभूषण परदेश दौऱ्यावर असताना आपल्या खेळाडूंसोबत एकाच हॉटेलातही राहत नव्हता.

दरम्यान, पत्रकारांनी ब्रिजभूषण सिंहला प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्यानं सांगितलं की, आत्ता केवळ माझ्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यांना आता न्यायालयात हे आरोप सिद्ध करावे लागतील आणि माझ्याकडे माझ्या निर्दोषतेचे सर्व पुरावे आहेत. हे सर्व खोटं प्रकरण आहे, त्यांच्याकडं माझ्याविरुद्ध कोणते पुरावे आहेत ते त्यांना सिद्ध करावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com