Brij bhushan Sharan Singh : लैंगिक शोषणांच्या आरोपांवर बृजभूषण भूमिका स्पष्ट करणार; आज... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brij Bhushan Sharan Singh Wrestler Protest

Brij bhushan Sharan Singh : लैंगिक शोषणांच्या आरोपांवर बृजभूषण भूमिका स्पष्ट करणार; आज...

नवी दिल्ली : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर आता स्वतः बृजभूषण सिंह आपली बाजू मांडण्याच्या तयारीत आहेत. (Brij bhushan Sharan Singh news in Marathi)

हेही वाचा: Brij Bhushan Singh : बृजभूषण यांच्याविरोधात मनसे आक्रमक; लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून...

जोपर्यंत लैंगिक शोषण करणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत एकही खेळाडू आगामी स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाही, अशी भूमिका महिला कुस्तीपटूंनी घेतली आहे. दिल्लीच्या जंतरमंतर मैदानात या खेळाडूंचं निषेध आंदोलन सुरु आहे. त्यामुळे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह आज दुपारी 12 वाजता उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील नवाबगंज येथील कुस्ती प्रशिक्षण केंद्रात पत्रकार परिषद घेणार आहेत.

हेही वाचा: Prisoners Release : प्रजासत्ताकदिनी राज्यातील कारागृहातून १८९ कैद्यांची सुटका होणार

दुसरीकडे अयोध्या इथं कुस्ती महासंघाची २२ जानेवारीला वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत बृजभूषण सिंह हजर राहणार आहेत. याच बैठकीत ते आपल्या पदाचा राजीनामा देतील असं सांगितलं जात आहे.

दरम्यान विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक ऑलिम्पिकपटू सध्या दिल्लीतील जतंरमंतर मैदानात १८ जानेवारीपासून आंदोलनाला बसले आहेत. यामध्ये विनेश फोगाटनं बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंचं आणि महिला प्रशिक्षकांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. तसेच जोपर्यंत बृजभूषण सिंह यांच्यासह फेडरेशनमधील इतर आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत एकही कुस्तीपटू आगामी स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.