

UP ATS operation
sakal
उत्तर प्रदेश:उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे यूपी एटीएस आणि रामनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत झारखंडमधील प्रतिबंधित नक्षली संघटना तृतीय सम्मेलन प्रस्तुती कमिटी (TPC)चा कमांडर बृजेश गंझू उर्फ गोपाल सिंह भोक्ता ठार झाला. रविवारी (२० सप्टेंबर) पहाटे रामनगर परिसरात ही चकमक झाली. बृजेशवर झारखंड सरकार आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) यांच्याकडून मिळून ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.