

प्रेमप्रकरणातून बिहारमधील वैशाली जिल्ह्यात एका दीर आणि भावजयीने विष प्राशन केल्याची घटना समोर आली आहे. झंडाहाच्या महिसौर पोलीस स्टेशन परिसरात प्रेमी युगुलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. भावजयीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान असे म्हटले जात आहे की, दीराचाही मृत्यू झाला आहे, परंतु याची पुष्टी झालेली नाही. या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.