
त्रिपुरामध्ये एका २६ वर्षीय तरुणाची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह आईस्क्रीम फ्रीजरमध्ये लपवण्यात आला होता. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी मुलीचा चुलत भाऊ आहे जो मुलीवर प्रेम करत होता आणि म्हणूनच त्याने तिच्या प्रियकराची हत्या करण्याचा कट रचला होता.