पाकला वाटलं नाही बालाकोटवर हल्ला होईल : धनोआ

वृत्तसंस्था
Friday, 20 September 2019

पाकिस्तानचा अंदाज नेहमी चुकीचा राहिला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर आपण बालाकोटवर हल्ला करु आणि आपले सरकार याला परवानगी देईल असे पाकिस्तानला वाटले नव्हते, असे हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : पाकिस्तानचा अंदाज नेहमी चुकीचा राहिला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर आपण बालाकोटवर हल्ला करु आणि आपले सरकार याला परवानगी देईल असे पाकिस्तानला वाटले नव्हते, असे हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी सांगितले. 

एका मुलाखतीत धनोआ यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, बालाकोटवेळी आम्हाला आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यापूर्वीच मी अंदाज वर्तवला होता आणि वायूदलाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच ते पुढे म्हणाले, राफेल लढाऊ विमान भारतीय वायूदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याने आता वायूदलाची ताकद वाढणार आहे. राफेलची भूमिका एखाद्या गेम चेंजरसारखी असेल.

मर्सिडिज चालवल्याचा अनुभव

एखादी व्यक्ती मारुती कार चालवत असेल आणि त्या व्यक्तीला मर्सिडिझ कार चालवण्यास दिली तर त्याला मोठा आनंद होईल. अशाचप्रकारचा आनंद राफेल फायटर जेट उडवल्यानंतर मला झाला, असेही धनोआ यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BS Dhanoa statement on Balakote Air Strike