B. S. Yediyurappa
esakal
बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना पोक्सो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. २) मोठा दिलासा दिला. येडियुराप्पा आणि इतर चार आरोपींनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) उच्च न्यायालयाचा आदेश स्थगित केला.