येडियुरप्पांची जागा कोण घेणार? 'या' सात नावांची चर्चा

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून त्यांच्याजागी आता कोणाची नियुक्ती होणार?
BS Yediyurappa
BS Yediyurappa

बंगळुरु: बी.एस. येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा (karnataka cm) राजीनामा दिला असून त्यांच्याजागी आता कोणाची नियुक्ती होणार? याबद्दल विविध तर्क-वितर्क लढवले जातायत. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी सात ते आठ नावांची चर्चा आहे. (BS Yediyurappa resigns Here are BJPs frontrunners for next Karnataka CM dmp82)

बसवराज बोम्मई

बसवराज बोम्मई सध्या कर्नाटकचे गृहमंत्री आहेत. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे ते विश्वासू सहकारी आहेत. बोम्मई हे जनता परिवारातून येतात. माजी मुख्यमंत्री एस.आर.बोम्मई यांचे ते सुपूत्र आहेत. बसवराज यांनी २००८ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये त्यांची प्रगती झाली. याआधी त्यांनी जलसिंचन खाते संभाळले आहे.

मुरुगेश नीरानी

मुरुगेश नीरानी सध्याच्या सरकारमध्ये खाणकाम आणि भूगर्भशास्त्र खात्याचे मंत्री आहेत. मुरुगेश हे प्रभावी पंचमशाली लिंगायत समाजातून येतात. लिंगायत समाजात पंचमशाली बहुसंख्य आहेत. याआधी ते उद्योग खात्याचे राज्यमंत्री होते. ते स्वत: उद्योजक आहेत.

त्यांच्या साखर, ऊर्जा आणि स्वच्छ उर्जा उद्योगात १ लाख लोक नोकरी करतात. ते तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. १९९० मध्ये आरएसएसमधून त्यांनी सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली.

BS Yediyurappa
मध्य रेल्वेच्या तिमाही कामगिरीचा महाव्यवस्थापकांकडून आढावा

अरविंद बेल्लाड

अरविंद बेल्लाड दुसऱ्यांदा आमदारकी भूषवत आहेत. ते उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी आणि स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखले जातात. अरविंद वरिष्ठ आमदार चंद्रकांत बेल्लाड यांचे ते सुपूत्र आहेत. स्वच्छ प्रतिमेमुळे अरविंद बेल्लाड यांना आरएसएसचा पाठिंबा आहे. तरुण आणि आधुनिक चेहरा म्हणून मुख्यमंत्रीपदावर त्यांची वर्णी लागू शकते.

सीटी रवी

सीटी रवी हे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. संघ परिवाराच्या ते अत्यंत जवळचे मानले जातात. भाजपाचे राष्ट्रीय संघटन सचिव बीएल संतोष यांचे ते निकटवर्तीय आहेत. याआधीच्या कर्नाटकातील भाजपा सरकारमध्ये ते शिक्षण मंत्री होते. संघटन बांधणीत त्यांचे कौशल्य आहे. संघटनेत काम करण्यासाठी अलीकडेच त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांची आमदारकीची चौथी टर्म आहे.

BS Yediyurappa
रायगड, कोल्हापूर, चिपळूणच्या मदतीला धावली मुंबई BMCची पथके

सीएन अश्वथ नारायण

सीएन अश्वथ नारायण सध्या कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री आहेत. उच्चशिक्षित असलेले अश्वथ नारायण डॉक्टर आहेत. अश्वथ नारायण हा भाजपाचा आधुनिक आणि तटस्थ चेहरा आहे. २००८ पासून ते आमदार आहेत. भाजपाचा हा तरुण आणि आधुनिक चेहरा आहे.

प्रल्हाद जोशी

प्रल्हाद जोशी सध्या खासदार आहेत. सध्या ते केंद्रीय संसदीय कामकाज आणि कोळसा मंत्री आहेत. धारवाडमधून तिसऱ्यांदा त्यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ते विश्वासू म्हणून ओळखले जातात. आरएसएसशी सुद्धा त्यांचे उत्तम संबंध आहेत.

सुनील कुमार

सुनील कुमार यांची आमदारकीची तिसरी टर्म आहे. उडपी जिल्ह्यातील कारकाला विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली आहे. केरळ भाजपाचे ते सहप्रभारी आहेत. सध्या कर्नाटक सरकारमध्ये चीफ व्हीपपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. संघ परिवारातून येणाऱ्या सुनील कुमार यांनी बजरंग दल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com