esakal | येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव; बहुमत सिद्ध
sakal

बोलून बातमी शोधा

yeddyurappa

येडियुरप्पा यांनी रविवारीच आपण बहुमत सिद्ध करू असा विश्‍वास व्यक्त केला होता. आज दुपारी विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीत त्यांनी 106 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) मागील सरकारने तयार केलेले अर्थविधेयक कोणत्याही बदलाशिवाय विधिमंडळात सादर केले जाईल. अर्थविषयक विधेयक विधिमंडळात मंजूर होणे गरजेचे आहे; कारण त्याशिवाय आम्हाला राज्य कारभाराचा गाडा हाकता येणार नाही, असेही येडियुरप्पा म्हणाले होते.

येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव; बहुमत सिद्ध

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बंगळूर : कर्नाटकच्या विधिमंडळात आज (सोमवार) मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकत बहुमत मिळविले. भाजपने कर्नाटक विधानसभेत 106 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. तर, विरोधात 100 मते पडली.

येडियुरप्पा यांनी रविवारीच आपण बहुमत सिद्ध करू असा विश्‍वास व्यक्त केला होता. आज दुपारी विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीत त्यांनी 106 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) मागील सरकारने तयार केलेले अर्थविधेयक कोणत्याही बदलाशिवाय विधिमंडळात सादर केले जाईल. अर्थविषयक विधेयक विधिमंडळात मंजूर होणे गरजेचे आहे; कारण त्याशिवाय आम्हाला राज्य कारभाराचा गाडा हाकता येणार नाही, असेही येडियुरप्पा म्हणाले होते.

विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी पक्षांतरबंदी कायद्याचा आधार घेत रविवारी चौदा बंडखोर आमदारांना अपात्र ठरविले. ही अपात्रता 2023 पर्यंत म्हणजे विधिमंडळाची मुदत संपेपर्यंत कायम राहील. यामुळे अपात्र ठरलेल्या एकूण बंडखोरांची संख्या सतरावर आली आहे. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेमुळे एकूण विधिमंडळाचे संख्याबळ घटून भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता.

तत्पूर्वी कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या विश्‍वासदर्शक ठरावावरील मतदानास वीस आमदारांनी दांडी मारल्याने कुमारस्वामी यांना पायउतार व्हावे लागले होते. आता कॉंग्रेसचे चौदा आणि "जेडीएस'चे तीन आमदार अपात्र ठरल्याने विधानसभा अध्यक्षांना वगळून सभागृहाचे संख्याबळ हे 207 वर आले होते. बहुमतासाठी जादुई आकडाही 104 वर आला होता. अखेर भाजपने 107 मते मिळवून विश्वासदर्शक ठरव जिंकला.

loading image