आपल्या तरुण मुलाला प्रत्येक पिता पैसे आणि नाव कमाविण्याचा सल्ला देत असतो, पण एका बीएसस्सीच्या विद्यार्थ्यांने आपल्या पित्याचे टोमणे एवढे मनावर घेतले की पटकन पैसे कमावण्यासाठी त्याने चक्क बॅंकच लुटण्याचा प्लॅन केला. यासाठी त्याने युट्यूबवर व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. एकट्या चोरट्यांनी बॅंक कशी फोडली याचे व्हिडिओ तो पाहू लागला. यानंतर तो बॅंक लुटायला गेला पण त्याच्यासोबत भलतंच घडलं.