esakal | पाकची नापाक हरकत, BSF कडून गोळ्यांचा वर्षाव सुरु होताचं ड्रोन फिरलं माघारी
sakal

बोलून बातमी शोधा

पाकची नापाक हरकत, BSF कडून गोळ्यांचा वर्षाव सुरु होताचं ड्रोन फिरलं माघारी

पाकची नापाक हरकत, BSF कडून गोळ्यांचा वर्षाव सुरु होताचं ड्रोन फिरलं माघारी

sakal_logo
By
दीनानाथ परब

श्रीनगर: जम्मूमधील IAF च्या बेसवर ड्रोन हल्ला झाल्याची घटना ताजी असताना, मंगळवारी रात्री उशिरा अर्णिया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ (international border) एक ड्रोन दिसलं. ड्रोन (drone) दृष्टीस पडताच सर्तक असलेल्या BSF च्या जवानाने ड्रोनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. गोळ्यांचा वर्षावर सुरु होताच ते ड्रोन पाकिस्तानच्या दिशेने माघारी फिरलं. (BSF fires at drone spotted near International Border in Jammu pulled it back towards the Pakistani side)

"१३ जुलैच्या रात्री ९.५२ च्या सुमारास अर्णिया सेक्टरमध्ये तैनात असलेल्या आमच्या जवानांना एक लाल लाईट चमकताना दिसली. आमच्या जागेपासून २०० मीटर अंतरावर ती लाईट चमकत होती. सतर्क असलेल्या जवानांनी आपल्या पोझिशनवरुन त्या ड्रोनच्या दिशेने गोळीबार केला. ते ड्रोन माघारी फिरलं. ड्रोन दिसलं त्या परिसरात शोध घेण्यात आला. पण काहीही सापडलेलं नाही" असं बीएसएफकडून सांगण्यात आलं.

हेही वाचा: मोनिका मोरेचे हात प्रत्यारोपण यशस्वी; दोन्ही हातांना संवेदना

२७ जूनला जम्मूमधील इंडियन एअर फोर्सच्या बेसवर (IAF base attack) झालेल्या हल्ल्यामध्ये 'प्रेशर फ्यूज' टेक्निकचा वापर करण्यात आल्याचं तपासातून समोर आलय. लष्कर-ए-तोयबाने (Lashkar-e-Toiba) घडवून आणलेल्या या ड्रोन हल्ल्यामध्ये (drone attack) त्यांना पाकिस्तानी लष्कर किंवा ISI ने मदत केल्याचे संकेत मिळत आहेत. तपास यंत्रणेतील सूत्रांनी ही माहिती दिली. IED स्फोटकांमुळे आयएएफच्या बेसवरील एका इमारतीच्या छताचे नुकसान झाले.

हेही वाचा: इंग्लंडची 'विम्बल्डन फायनल' अन् मुंबई हायकोर्ट.. वाचा रंजक किस्सा

१ किलोपेक्षा कमी RDX आणि मिक्स केलेले केमिक्लस होते. दुसरा स्फोट मोकळ्या जागेत झाला. त्या स्फोटकांचे वजन १ किलोपेक्षा जास्त होते. २७ जूनला झालेल्या हल्ल्यात निश्चित पाकिस्तानी लष्कराच्या टेक्निकल ज्ञानाचा वापर करण्यात आला. पाकिस्तानी लष्कराने एकदा 'प्रेशर फ्यूज' टेक्निकचा वापर केला होता.

loading image