पाकच्या गोळीबारात बीएसएफचा अधिकारी हुतात्मा
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी हुतात्मा झाला. विनय प्रसाद असे हुतात्मा झालेल्या अधिकाऱयाचे नाव आहे.
बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर सहाय्यक कमांडन्ट विनय प्रसाद आणि त्यांची टीम आज सकाळी 10.50च्या सुमारास गस्त घालत होती. यावेळी पाकिस्तानी स्नायपर्सकडून अंदाधुंदपणे गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात विनय प्रसाद हे गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून दिवसेंदिवस शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.