
modi 4g yogi
esakal
"पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत आज जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने उभा आहे. कोणत्याही धमक्यांना न जुमानता, भारत आता डिजिटल क्रांतीमध्ये जगाचे नेतृत्व करत आहे," असे मत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले. शनिवारी लखनौ येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातून स्वदेशी बीएसएनएल ४-जी नेटवर्क आणि भारतनेट प्रकल्पाचे व्हर्च्युअल उद्घाटन केले, ज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी झाले होते.