जिओची फ्री कॉल ऑफर विसरा; कॉल केल्यावर उलट तुम्हालाच पैसे देणार 'ही' कंपनी

वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

ग्राहकांना खूश करण्यासाठी सरकारी कंपनी बीएसएनएलने एक मोठी घोषणा केली आहे. बीएसएनल आता ग्राहकांना कॉल केल्यावर पैसे देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने पहिल्यांदा फ्री कॉल ऑफर देऊन आपल्या ग्राहकांना खूश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 6 पैसे प्रति मिनीट आकारले जातील असं जाहीर केलं आहे. यांनंतर ग्राहकांना खूश करण्यासाठी सरकारी कंपनी बीएसएनएलने एक मोठी घोषणा केली आहे. बीएसएनल आता ग्राहकांना कॉल केल्यावर पैसे देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बीएसएनएलकडून सांगण्यात आले आहे की, प्रत्येक 5 मिनिटाच्या कॉलसाठी ग्राहकांच्या खात्यात 6 पैसे पाठवण्यात येतील. कंपनी ही कॅशबॅक ऑफर देशात सर्वत्र बीएसएनएल वायरलाइन, ब्रॉडबँड आणि एफटीटीएच ग्राहकांना देणार आहे. बीएसएनएलने आययुसीचा मुद्दा चर्चेत असतानाच ही घोषणा केली आहे. ग्राहकांनाच पैसे देण्याच्या बीएसएनएलच्या घोषणेमुळे जिओला धक्का बसणार आहे. जिओने ग्राहकांसाठी स्वस्तातल्या ऑफर दिल्याने गेल्या दोन वर्षात टेलिकॉममध्ये त्यांचाच दबदबा वाढला आहे.

जिओच्या ज्या ग्राहकांनी 9 ऑक्टोबर किंवा त्याआधी रिचार्ज केला असेल तर तो ग्राहक रिचार्ज प्लॅन संपेपर्यंत जिओव्यतिरिक्त इतर कंपन्यांनादेखील फ्री कॉल करू शकतो. सध्याचा प्लॅन संपल्यानंतर मात्र पैसे मोजावे लागणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSNL will credit money in your account for every voice call above 5 minutes