Mayavati: युपीमध्ये निवडणुकीची गणितं बदलणार! इंडिया आघाडीसोबत जाण्याबाबाबत मायावतींनी स्पष्टच सांगितलं

बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) प्रमुख मायावती हे इंडिया आघाडीसोबत येणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.
mayavati
mayavatiesakal

नवी दिल्ली : बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) प्रमुख मायावती हे इंडिया आघाडीसोबत येणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द मायावती यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात वेगळंच समीकरण पहायला मिळणार आहे. (bsp chief mayawati tweets in interest of bahujan community BSP stands by its decision to contest lok sabha election on its own)

mayavati
भोपाळमध्ये मंत्रालयालात अग्नितांडव, महत्वाचे कागदपत्रे जळून खाक, आगीचं कारण काय?

मायावती यांनी म्हटलं की, बसपा देशात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आपल्या स्वतःच्या जीवावरच दमदारपणे लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं आम्ही कोणाशी युती-आघाडी किंवा तिसरी आघाडी करण्याच्या चर्चा या केवळ अफवा आहेत. (Marathi Tajya Batmya)

ही फेक न्यूज आणि चुकीची बातमी आहे. माध्यमांनी अशा प्रकारे खोडसाळ बातम्या देऊन आपली विश्वासार्हता गमावू नये, लोकांनी देखील सावध राहायला हवं. (Latest Marathi News)

विशेषतः उत्तर प्रदेशात बसपा खूपच मजबुतीनं एकट्यानं लोकसभा निवडणूक लढवणार असल्यानं विरोधी लोक खूपच बैचेन झाले आहेत. त्यामुळं प्रत्येक दिवशी ते विविध प्रकारच्या अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. परंतू बहुजन समाजााच्या हितासाठी बसपा एकट्यानं निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहे, असंही मायावती यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com