तिकीट न मिळाल्याने बसपा नेत्याला कोसळले रडू, 67 लाख हडपल्याचा केला आरोप | UP Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्शद राणा

तिकीट न मिळाल्याने बसपा नेत्याला कोसळले रडू, 67 लाख हडपल्याचा केला आरोप

मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपमधील (BJP Leader Resignation In UP ) आमदार आणि मंत्र्यांचे राजीनामा सत्र सुरू असतानाच, बहुजन समाज पक्षाची देखील (BSP) स्थिती फारशी चांगली दिसत नाहीये, कारण बसपाच्या तिकीट वाटप प्रकरण आता थेट पोलिसंपर्यंत जाऊन पोहोचले आहे. (Election Ticket ) दरम्यान, बसपाचे चरथावल विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी अर्शद राणा (Arshad Rana) यांना तिकिट न मिळाल्याने त्यांना रडू कोसळल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर, बसपा नेत्याने तिकिट देण्यासाठी 67 लाख रुपये हडपल्याचा देखील आरोप केला आहे. (UP Assembly Election 2022)

हेही वाचा: दिल्लीत बॉम्ब तर पंजाबमध्ये RDX सापडल्यानं खळबळ

न्याय न मिळाल्यास आत्मदहनची धमकी

बसपा (BSP Leader Arshad Rana) नेते अर्शद राणा यांच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक आनंद देव मिश्रा यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, न्याय न मिळाल्यास लखनऊ येथील बसपा कार्यालयात जाऊन आत्महत्या करण्याचा इशारा राणा यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

हेही वाचा: EPFO च्या खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; नियमांमध्ये होणार बदल

शमशुद्दीन रैन यांच्यावर गंभीर आरोप

18 डिसेंबर 2018 रोजी जिल्ह्याच्या विधानसभा जागांच्या प्रभारींची नियुक्ती जिल्हा कार्यालय, मुझफ्फरनगर येथे होणार होती. याच्या एक-दोन दिवस आधी बसपाचे पश्चिम उत्तर प्रदेश प्रभारी शमशुद्दीन रैने म्हणाले की, तुम्हाला चारथावल विधानसभा जागेसाठी उमेदवार म्हणून नियुक्त केले जाईल. यासाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागतील, त्यासाठी मी होकार दिला होता, असे राणा यांनी सांगितले. (Money For Election Ticket)

शमशुद्दीन रैन यांना 67 लाख दिले : राणा

अर्शद राणा म्हणाले की, 'विधानसभा मतदारसंघात उमेदवार नेमण्यासाठी 4 लाख 50 हजार रुपये आणि नंतर 50 हजार रुपये घेण्यात आले. यानंतर 15-15 लाखांचे तीन हप्ते घेण्यात आले. यानंतरही सतपाल कटारिया आणि नरेश गौतम यांच्या उपस्थितीत पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी शमशुद्दीन रैन यांनी थोडे-थोडे करत 17 लाख रुपये घेतले. तसेच चारठावळ विधानसभेच्या जागेवर तुम्हालाच उमेदवारी देण्यात आली असून तुम्ही मनापासून काम करण्यास सुरु करा असे सांगण्यात आल्याचे राणा यांनी सांगितले.

बसपाचे जिल्हाध्यक्षाने मागितले 50 लाख रुपये

अर्शद राणा यांनी आरोप केला की, 'निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यावर मी बसपचे जिल्हाध्यक्ष सतीश कुमार यांच्याकडे चारथावळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी पक्षाकडून तिकीट मागितले, तेव्हा त्यांनी सांगितले की, तुम्हाला आणखी 50 लाख रुपयांची व्यवस्था करावी लागेल, त्यासाठी त्यांनी मला आश्वासन दिले होते. मात्र, असे असतानाही सलमान सईदला चारथावल विधानसभेचे उमेदवार घोषित करण्यात आले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top