सोशल मीडियावर मायावती होणार अॅक्टिव्ह; ट्विटरनंतर Facebook, Instagram वर पक्षाचं पेज करणार सुरु I BSP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BSP chief Mayawati

पक्ष आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पक्षाच्या अधिकृत पेजची पडताळणी करण्यात गुंतला आहे.

BSP : सोशल मीडियावर मायावती होणार अॅक्टिव्ह; ट्विटरनंतर Facebook, Instagram वर पक्षाचं पेज करणार सुरु

बरेली : बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख मायावती 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तयारीत व्यस्त आहेत. दलित-मुस्लिम आणि ओबीसींपाठोपाठ बसपा आता तरुणांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

त्यामुळं बसपा प्रमुख मायावतींनी पहिल्यांदाच सोशल मीडियावर येण्याची योजना आखली आहे. आपल्या कार्यकर्त्यांना मीडियापासून नेहमी अंतर ठेवण्याचा संदेश देणाऱ्या मायावतींनी (Mayawati) सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना पक्षाचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज बनवण्याच्या सूचना केल्या आहेत.

तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

बसपा प्रमुखांचा प्रयत्न तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा आहे. देशातील बहुतांश तरुण सोशल मीडियावर आहेत. बसपा त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आकर्षित करेल. पूर्वी बसपा फक्त ट्विटर आणि यूट्यूबवर होती. मात्र, मिशन 2024 नं लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी खास रणनीती आखली आहे. यासोबतच पक्ष आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पक्षाच्या अधिकृत पेजची पडताळणी करण्यात गुंतला आहे.

हेही वाचा: Ramdas Athawale : आठवलेंची नाराजी उघड; शिंदे-फडणवीस सरकारविरोधात पहिल्यांदाच केलं भाष्य, काय म्हणाले मंत्री?

दलित मतदार बसपापासून जाताहेत दूर

एससी तरुणही बसपाच्या या प्रयत्नात सामील होतील. दलित बसपापासून दूर जात आहेत. कारण, यूपीमध्ये 22 टक्के दलित आहेत. पण, 2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत बसपाला केवळ 12.50 टक्के मतं मिळाली होती.

हेही वाचा: Congress : काँग्रेस सत्तेत आल्यावर विधानभवन गोमूत्रानं स्वच्छ करणार, बड्या नेत्याचं वादग्रस्त विधान

निवडणुकीत बसपा तरुणांना तिकीट देणार

50 टक्के तरुणांना पक्षात सहभाग देण्याचा बसपाचा प्रयत्न आहे. निवडणुकीतही बसपा तरुणांना तिकीट देणार आहे. यासोबतच युवा संघटना स्थापन करण्याचा विचार आहे. त्यासाठीही पक्ष मेहनती तरुणांचा शोध घेत आहे. दरम्यान, बसपा सरकारचं यश, पक्षाची धोरणं आणि पक्षाचं ध्येय बसप सोशल मीडियाच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर देणार आहे. त्यासोबतच दलित समाजासाठी करावयाच्या कामांचीही माहिती दिली जाणार आहे.