शेजारणीचे फोटो अन् चॅटचे स्क्रिनशॉट भिंतीवर चिटकवले, ३० वर्षीय तरुणानं संपवलं आयुष्य, पती-पत्नीला अटक

Crime : बीटेक, एमबीए झालेल्या ३० वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय. तरुणाने आत्महत्येआधी खोलीत भिंतीवर शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेचे फोटो आणि चॅटचे फोटो चिटकवले होते.
 30 Year Old Engineer Dies by Suicide Two Arrested

30 Year Old Engineer Dies by Suicide Two Arrested

Esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील गोंडा इथं अभिषेक श्रीवास्तव यानं घरात गळफास घेत आत्महत्या केली. बीटेक आणि एमबीए झालेल्या ३२ वर्षीय अभिषेकनं प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्या खोलीत भिंतीवर एका महिलेचे फोटो, व्हॉटसअप चॅटचे स्क्रिनशॉट प्रिंट केलेले चिटकवण्यात आले होते. तर जमिनीवरही काही कागद पडले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com