
बजेट 2022: 5G टेक्नोलॉजीच्या विकासावर असू शकते अर्थमंत्र्यांचे लक्ष
Budget 2022: केंद्रीय अर्थमंत्री (Union Finance Minister) निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प करणार आहेत. अर्थमंत्र्य़ांनी टेलीकॉम सेक्टरशी (Telecom Sector) संबंधित काही मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये भारतातील दूरसंचार क्षेत्राने आपली ताकद, दाखवून दिली आहे, पण देशातील तंत्रज्ञान उद्योगांसमोर अनेक प्रकारची आव्हाने उभी असल्याचे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचे व्यवस्थापकीय आणि वरिष्ठ संचालक विकास जैन म्हणाले. सध्या या उद्योगाला नवीन प्रकारच्या प्रतिभा आणि कौशल्याची गरज आहे. या क्षेत्रामध्ये देशाच्या आतापर्यंतच्या वंचित भागांना सेवा पुरवण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे बदल होऊ शकतात असे त्यांचे म्हणणे आहे. (Budget 2022: Finance Minister may focus on development of 5G technology)
हेही वाचा: Budget 2022: अन्न आणि खत अनुदानासाठी 3 लाख कोटी रुपये मिळणार?
याशिवाय टेलिकम्युनिकेशनमधील 5G, डिजिटल मीडिया (Digital Media), मॅन्यूफॅक्चरिंगसारख्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्याची प्रचंड क्षमता आहे. हे लक्षात घेऊन अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात तंत्रज्ञानाच्या विकासावर भर द्यावा अशी मागणी जोर धरते आहे. (Union Budget 2022 Live Updates)
दूरसंचार क्षेत्रातील सुधारणांच्या घोषणेबरोबरच 5G तंत्रज्ञानाबाबत अर्थमंत्र्यांचे काय मत असेल याकडे सर्वांचे लक्ष असेल असे जे सागर असोसिएट्सचे टोनी वर्गीस म्हणाले. या वर्षभरात स्पेक्ट्रम लिलाव होण्याचीही शक्यता आहे, असेही ते पुढे म्हणाले. यासोबतच सॅटेलाइट सेवा क्षेत्रही सुरू करता येणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळेच या अर्थसंकल्पात स्पेस टेक्नोलॉजीसोबत या टेक्नोलॉजीसंबंधित भागांच्या निर्मितीवर भर दिला जाण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा: Budget 2022: यंदा बजेटमध्ये सर्वसामान्यांना 3 गिफ्ट्स मिळण्याचा अंदाज!
बीएसएनएल (BSNL) आणि एमटीएनएलशी (MTNL) संबंधित समस्यांबाबतीत विचार होण्याची शक्यता आहे. या कंपन्यांच्या रिवायवल योजना यशस्वी झाल्या नाहीत. शिवाय या कंपन्यांची पोहोच चांगली असतानाही टेक्नोलॉजी अपग्रेड करण्यात या कंपनी अयशस्वी ठरल्या आहेत.
Web Title: Budget 2022 Finance Minister May Focus On Development Of 5g Technology
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..