esakal | म्हशीनी चांगलीच जिरवली; व्हिडिओ व्हायरल...

बोलून बातमी शोधा

buffalos revenge men who were torturing it goes viral}

म्हशीला गाडीला जुंपून त्यावर काही युवक बसले होते. रस्त्यावरून जोरात पळण्यासाठी म्हशीला मारहाण केली जात होती. पण, गाडी रस्त्यावरील डिव्हायडरवर जाऊन आदळते आणि युवक रस्त्यावर फेकले जातात. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

म्हशीनी चांगलीच जिरवली; व्हिडिओ व्हायरल...
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली: म्हशीला गाडीला जुंपून त्यावर काही युवक बसले होते. रस्त्यावरून जोरात पळण्यासाठी म्हशीला मारहाण केली जात होती. पण, गाडी रस्त्यावरील डिव्हायडरवर जाऊन आदळते आणि युवक रस्त्यावर फेकले जातात. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नवरी म्हणाली; काही झालं तरी लग्न करणारचं अन्...

आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. व्हिडिओला शीर्षक देताना त्यांनी म्हटले आहे की, 'या म्हशीला ग्लोबल सपोर्ट मिळतो आहे. असे वाटतेय एखादा चित्रपटही येईल 'बदला भैस का'.
 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये युवक गाडीवर बसले आहेत. या गाडीसमोर आणखी एक गाडी आहे. यावरील लोक म्हशींना मारत आहेत आणि त्यांच्या क्षमतेपेक्षा वेगाने पळवण्याचा प्रयत्न करत आहेत. वेगाने पळण्यासाठी त्यांना मारहाणही करत आहेत. पण, वेगाने धावणारी एक गाडी रस्त्याच्या डिव्हायडरवर जाऊन आदळते. त्या गाडीवर बसलेले सगळे लोक फेकले जातात आणि म्हैस गाडी सोडून पुढे धावत जाते. संबंधित व्हिडिओ जुना आहे. पण सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. दरम्यान, गाडीवरील दोघांची ओळख पटली असून ते मध्यप्रदेशातील उज्जैनमधील आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोरोनाची 'एक्सपायरी डेट' ठरली...