नवरी म्हणाली; काही झालं तरी लग्न करणारचं अन्...

वृत्तसंस्था
Monday, 25 May 2020

कोरोना व्हायरसमुळे अनेक विवाह पुढे ढकलण्यात आले आहेत, तर काही विवाह मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत पार पाडले जात आहेत. पण, लॉकडाऊनमुळे एका नवरदेवाने विवाह करण्यात नकार दिला. पण, नवरीने ठरवले आणि विवाह पार पडला. संबंधित विवाहाची परिसरात चर्चा सुरू आहे.

कानपूर (उत्तर प्रदेश) : कोरोना व्हायरसमुळे अनेक विवाह पुढे ढकलण्यात आले आहेत, तर काही विवाह मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत पार पाडले जात आहेत. पण, लॉकडाऊनमुळे एका नवरदेवाने विवाह करण्यात नकार दिला. पण, नवरीने ठरवले आणि विवाह पार पडला. संबंधित विवाहाची परिसरात चर्चा सुरू आहे.

नागाचा फणा अन् कोंबडीची चोच; पाहा व्हिडिओ...

मोहनपूर गावातील  वीरेंद्र कुमार याचे लग्न ठरले होते. पण, लॉकडाऊनमुळे त्याने विवाह पुढे ढकलण्याचे ठरवले. पण, नवरी म्हणाली, काही झाला तरी विवाह ठरलेल्या मुहुर्तावर करायचाच. पण, मुलाकडील नातेवाईक तयार होत नव्हते. साधारणतः मुलाकडील मंडळी विवाहासाठी नवरीच्या गावात जातात. पण, नवरदेवाने विवाह करण्यास नकार दिल्यामुळे नवरीने मोजक्या नातेवाईकांना घेऊन मुलाच्या गावात जाण्याचे ठरवले. मग, तयारी सुरू झाली. नवरी गावात येणार असल्याचे समजल्यानंतर गावाच्या प्रवेशद्वारापासून परिसर सॅनिटाइज करण्यात आला. शिवाय, विवाहासाठी उपस्थित असणाऱया नागरिकांना मास्कचे वाटप कण्यात आले. गावातील सरपंचाची विवाहासाठी परवानगी घेण्यात आली आणि विवाह ठरलेल्या मुहुर्तावर पार पडला.

पोलिस चौकीतच कापला एकाने पोलिसाचा कान...

दरम्यान, नवरीने विवाह करण्याचे ठरवल्यामुळे विवाह ठरलेल्या मुहुर्तावर पार पडला, अशी प्रतिक्रिया नवरदेवाकडील नातेवाईकांनी दिली. संबंधित विवाहाची परिसरात चर्चा रंगली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown wedding bride reaches at groom for wedding at uttar pradesh