
एक इमारत अवघ्या पाच सेकंदात पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
बंगळुरू : एक इमारत अवघ्या पाच सेकंदात पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
Video: नारळाच्या झाडावर साप कसा चढतोय पाहा...
कर्नाटकमध्ये सध्या पाऊस पडत आहे. एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या मागच्या बाजूला तीन मजली इमारत कोसळली. व्हिडीओमध्ये संपूर्ण इमारत एका विशिष्ट बाजूने पत्त्यांच्या बंगल्यासारखी खाली कोसळली आहे. संबंधित घटना कॅमेऱयात कैद झाली आणि व्हिडिओ व्हायरल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात बांधकामे सुरू आहेत. आजूबाजूला सुरू असणाऱ्या कामामुळे ही इमारत कोसळली का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही इमारत नेमकी कशामुळे कोसळली याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
#WATCH Karnataka: A three-storied building behind an under construction site in Majestic area of Bengaluru collapsed yesterday; no casualties reported. pic.twitter.com/FYeiMnbrEw
— ANI (@ANI) July 28, 2020
दरम्यान, देशातील विविध भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशातील विविध भागांमध्ये पावसामुळे भूस्खलनामुळे इमारती कोसळताना दिसत आहेत.