esakal | मांजरीच्या पिल्लावर सामूहिक बलात्कार अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

pakistani teenage boys allegedly torcher kitten death in lahore

पाकिस्तानमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका मांजरीच्या पिल्लावर आठवडाभर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली.

मांजरीच्या पिल्लावर सामूहिक बलात्कार अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लाहोर (पाकिस्तान): पाकिस्तानमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका मांजरीच्या पिल्लावर आठवडाभर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. यामध्ये मांजरीच्या पिल्लाचा तडफडून मृत्यू झाला आहे. एका स्थानिक स्वयंसेवी संघटनेने याबाबतची पोस्ट फेसबुकवर टाकल्यानंतर ही घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय मुलाने मित्रासोबत मिळून हे कृत्य केले आहे.

Video: नारळाच्या झाडावर साप कसा चढतोय पाहा...

पाकिस्तानमधील JFK Animal Rescue And Shelter या स्वयंसेवी संस्थेनं (एनजीओ) या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. एनजीओने आपल्या फेसबुक पेजवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, मांजरीच्या पिल्लाला सामूहिक अत्याचारामुळे अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाली. त्यामुळे पिल्लाचा मृत्यू झाला आहे. मांजरीच्या पिल्लाला उपचारासाठी जेव्हा पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात स्पर्म, रक्त आणि प्लास्टिक आढळून आले. मांजरीवरील आत्याचाराचे हे कृत्य एवढे भयंकर आहे की, यामुळे माणुसकीला देखील काळीमा फासली गेली आहे. याबाबतची माहिती प्रसारीत झाल्यानंतर नागरिक निषेध व्यक्त करत आहेत.

शिवाय, एनजीओने फेसबुक पोस्टमध्ये लिहीले आहे की, मांजरीवर अत्यंत वाईट पद्धतीने अत्याचार करण्यात आला होता. पण, पशुवैद्यकीय डॉक्टरांनी याबाबत लिखित स्वरुपात देण्यास नकार दिला. कारण, या भयंकर घटनेत त्यांना कोणत्याही प्रकारे सामील व्हायचे नाही. पाकिस्तानमधील मुलांना लैगिंक शिक्षणाची गरज आहे. पण काही लोक याच्या विरोधात आहेत. या घृणास्पद घटनेनंतर दोषी मुलांविरोधात पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात कारवाईची मागणी होऊ लागली आहे.

Video: गुहेतून मुलाचा फक्त हात दिसत होता...