UP Building Collapsed: उत्तर प्रदेशात इमारत कोसळली; 30 जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची शक्यता

Building collapses in UP: जवळपास ३० लोक इमारतीखाली दबले गेल्याची शक्यता आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
Building collapses
Building collapses

लखनऊ- उत्तर प्रदेशच्या मुझफ्फनगरमध्ये एक बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमारत जेव्हा कोसळली त्यावेळी अनेक लोक आतमध्येच होते. प्राथमिक माहितीनुसार, जवळपास ३० लोक इमारतीखाली दबले गेल्याची शक्यता आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. (Building collapses in Uttar Pradesh muzaffarnagar 30 people are likely to be buried under the debris)

रेस्क्यू टीम बचावकार्य राबवत आहेत. स्थानिक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत. घटनास्थळी मोठे प्रशासकीय अधिकारी पोहोचले आहेत. रविवारी दुपारी अचानक इमारतीचे छत कोसळले. घटनेनंतर लगेचच स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली होती.

Building collapses
Accident News: विजयपूरमध्ये भीषण अपघातात ४ ठार; तर तीन जण जखमी, सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली अन्...

घटनास्थळी चार ते पाच जेसीबी बोलावण्यात आले आहेत. ढिगारा हटवून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास १२ जणांना ढिगाऱ्या खालून काढण्यात आलं आहे. अद्याप अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा कळत आहे. सर्वजण मजूर असल्याचं कळतंय. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com