
Summary
बुलंदशहर, उत्तरप्रदेश येथे भरधाव कंटेनरने भाविकांच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून ४३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना जवळच्या विविध रुग्णालयांत दाखल करून उपचार सुरू आहेत.
उत्तरप्रदेशमधील बुलंदशहर जवळ सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. कासंगजवरुन राजस्थानला जात असलेल्या भाविकांच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला भरधाव कंटेनर धडकल्याने ८ जणांचा मृत्यू झाला असून ४३ जखमी झाले आहेत.