अबब! 'या' बैलाचा स्पर्म सर्वात महाग; तब्बल एक कोटींची बोली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक कोटीचा बैल

कृष्णा नावाचा साडेतीन वर्षाचा हा बैल आहे. त्याची किंमत चक्क एक कोटी रुपये आहे.

अबब! 'या' बैलाचा स्पर्म सर्वात महाग; तब्बल एक कोटींची बोली

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

बैल हा शेतकऱ्याचा शेती कामातील साथीदार आहे. कितीही संकट आली तरी बैल त्याच्या मालकाला म्हणजे शेतकऱ्याला दिवस-रात्र कामात मदत करत असतो. आणि शेतीतून फायदा मिळवून दयायचे काम करतो. परंतु बंगळूरमध्ये बैलाने स्वत:च्या मालकाला एका दुसऱ्या कामानिमित्त मालामाल केले आहे. कृष्णा नावाचा साडेतीन वर्षाचा हा बैल आहे. त्याची किंमत चक्क एक कोटी रुपये आहे.

या वर्षीच्या बंगळुर येथे झालेल्या कृषी मेळाव्यात बैल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. असे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. यावेळी या बैलाचे मालक बोरेगौडा म्हणाले की, हा बैल 'हल्लीकर' जातीचा आहे. ज्यास "सर्व पशु जातींची माता" असे मनले जाते. या बैलाच्या जातीच्या विर्यला (स्पर्म) जास्त मागणी आहे. आणि त्याचा एक डोस एक हजार रुपयांपर्यंत विकला जातोय.

या वर्षी 11 नोव्हेंबर रोजीच्या कृषी मेळाव्यासाठी बारा हजारहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केलीय. त्यापैंकी अनेकांनी घटनास्थळी नोंदणी केली आहे. यामध्ये तब्बल 550 स्टॉल्स आहेत. यामध्ये गुरेढोरे, कुक्कुटपालन आणि सागरी याव्यतिरिक्त पारंपारिक आणि संकरित पीकाचे प्रकार, तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री प्रदर्शित करण्यात आलेली आहेत.

यावर्षीच्या कृषी मेळ्यातील स्टॉल्सचा उद्देश हा रोपे, बियाणे आणि पोल्ट्री विक्री हा आहे. या वर्षीचा चार दिवसीय कृषी मेळाव्याचे उद्घाटन विशेष म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अनुपस्थितीत शुक्रवारी एका आदिवासी महिलेने आधुनिक शेतकरी बनून केले आहे. कृषी विज्ञान विद्यापीठाने आयोजित केलेल्या मेळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात, प्रेमदासप्पा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

loading image
go to top