‘रेवड्या संस्कृती’ देशाला घातक ठरेल

‘मोफत’ वाटपाच्या पद्धतीवर मोदींची टीका
Bundelkhand Expressway was inaugurated by Prime Minister Narendra Modi
Bundelkhand Expressway was inaugurated by Prime Minister Narendra Modisakal

जालौन - देशात मोफत सुविधा देण्याचे राजकारण धोकादायक असून अशा प्रकारची ‘रेवड्या संस्कृती’ देशाच्या विकासासाठी घातक असल्याची टीका आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. जालौन जिल्ह्यातील उरई येथील कॅथेरी गावात सुमारे १४,८५० कोटी रुपयांच्या खर्चातून उभारलेल्या बुंदेलखंड एक्स्प्रेस-वेचे उदघाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की ‘रेवड्या संस्कृती’ बाळगणारे नेते हे आपल्यासाठी कधीही एक्स्प्रेस वे तयार करणार नाहीत, नवीन विमानतळ किंवा डिफेन्स कॉरिडॉर देखील करणार नाहीत. रेवडी संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्या नेत्यांना वाटते की, जनतेला मोफत वस्तू घेऊन त्यांना खरेदी करता येऊ शकते. परंतु आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा प्रकारच्या विचारसरणीचा पराभव करायला हवा. देशातील राजकारणातून रेवड्या संस्कृती हद्दपार करा, असे आवाहनही त्यांनी केले.

उत्तर प्रदेशमध्ये डबल इंजिनचे सरकार आता वेगाने काम करत आहे. चांगल्या दळणवळण सुविधांसह राज्यात व्यापक बदल होत असल्याचे ते म्हणाले. बुंदेलखंड एक्स्प्रेसवेच्या माध्यमातून चित्रकूटहून दिल्लीचे अंतर तीन तासांनी कमी झाले आहे. पण त्यापेक्षा अनेक फायदे स्थानिक जनतेला होणार आहेत. या महामार्गाने केवळ वाहनांना गती मिळणार नाही तर संपूर्ण बुंदेलखंडच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. बुंदेलखंडमध्ये नागरिकांना भविष्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही. आता प्रत्येक पाणी पोचवण्यासाठी पाणीपुरवठा योजनेवर युद्धपातळीवर काम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. युवकांनी ‘रेवड्या संस्कृती’पासून सावध राहावे, असे आवाहन करत देशाच्या विकासासाठी मोफत वाटण्याचा ट्रेंड हा धोकादायक ठरू शकतो, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकांसाठी मोफत योजना म्हणजे पुण्यकर्म : केजरीवाल

नवी दिल्ली - नागरिकांना विविध सेवा मोफत देण्याच्या योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षावर निशाणा साधल्यावर आपचे सर्वेसर्वा व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लोकांसाठी मोफत देण्याच्या योजना म्हणजे ‘रेवड्या‘ वाटण्याचे नव्हे तर पुण्यकर्माचे, विकसित, गौरवशाली भारताची पायाभरणी करण्याचे काम आहे, अशा शब्दांत केजरीवाल यांनी उलटवार केला आहे.

केजरीवाल म्हणाले, की दिल्लीत १८ लाख गरीब मुलांना मोफत शिक्षण देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, लाखो लोकांना मोफत उपचारांकरवी त्यांचे प्राण वाचविणे हे रेवड्या वाटणे नव्हे. हे घातक काम नसून देशहिताचे व देशाची पायाभरणी करण्याचे पुण्यकर्म आहे. रेवडी संस्कृती म्हणून याला हिणविणे योग्य नाही. मागच्या काही वर्षांत दिल्लीत ४ लाख पालकांनी आपल्या मुलांना खासगी शाळांतून काढून सरकारी शाळांत पाठविले.गरीब मुलांचे भवितव्य सावरले हा काय गुन्हा झाला काय? असाही सवाल केजरीवाल यांनी विचारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com