Weight Loss करा अन् मिळवा एक्स्ट्रा सॅलरी ; कंपनीच्या SEO चं कर्मचाऱ्यांना फिटनेस चॅलेंज

ऑनलाइन ब्रोकिंग फर्म जेरोधाचे सह-संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फिटनेस चॅलेंज दिलं आहे
Zerodha Nithin Kamath offers rs 10 lakh reward to employee
Zerodha Nithin Kamath offers rs 10 lakh reward to employeeesakal

देशात वजनवाढीमुळे अनेकजण त्रस्त आहेत. डब्ल्यूएचओच्या 2016 च्या अहवालानुसार, जगातील 100 कोटी लोक लठ्ठ आहेत, त्यापैकी 650 दशलक्ष लोक लठ्ठ आहेत. त्याच वेळी, 2017 च्या अहवालात असे म्हटले आहे की दरवर्षी 40 लाख लोक लठ्ठपणामुळे मरतात. असा अहवाल समोर आला आहे. अशातच, एका कंपनीने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासंदर्भात नवा फंडा वापरला आहे. (burn 350 calories and get one month salary Zerodha Nithin Kamath offers rs 10 lakh reward to employees )

ऑनलाइन ब्रोकिंग फर्म जेरोधाचे सह-संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फिटनेस चॅलेंज दिलं आहे. इतकेच नव्हे तर सीईओने जो कर्मचारी आपलं फिटनेस लक्ष्य पूर्ण करेल त्याला बोनस स्वरुपात एका महिन्याची एक्स्ट्रा सॅलरी दिली जाईल अशी जबरदस्त घोषणादेखील केली आहे.

कंपनीचे बहुतांश कर्मचारी सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत. यामुळे एका जागेवर तासंतास बसून राहणं आणि धूम्रपानाच्या सवयीत वाढ झाली आहे. याचपार्श्वभूमीवर जेरोधाचे सह-संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी टीमला आरोग्याच्या दृष्टीकोनातून सक्षम करण्यासाठी एक चॅलेंज दिलं आहे. फिटनेस ट्रॅकरचा वापर करुन स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये घडलेला बदल आम्हाला पाहायचा आहे, असं कामथ यांनी म्हटलं आहे.

कामथ यांनी आपल्या पोस्टमध्ये याची संपूर्ण माहिती दिली आहे. "जेरोधामध्ये आमचं नवं चॅलेंज फिटनेस ट्रॅकर्सवर डेली टार्गेट सेट करावं लागणार आहे. एका वर्षासाठी जो कर्मचारी आपलं दैनंदिन टार्गेट ९० टक्के पूर्ण करण्यात यशस्वी होईल त्याला एका महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाईल", असे कामथ यांनी म्हटले आहे.

कामथ यांच्या चॅलेंजनुसार एका महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याला आपल्या दैंनदिन फिटनेस टार्गेट ९० टक्क्यांपर्यंत गाठणं महत्वाचं असणार आहे. यासोबतच १० लाख रुपयांसाठीचा एक लकी-ड्रॉ देखील ठेवण्यात आला आहे.

कामथ बंधूंनी २०१० साली जेरोधा कंपनीची स्थापना केलीहोती. जेरोधा एक फायनान्शियल सर्व्हिस कंपनी आहे. ही कंपनी शेअर मार्केटमध्ये खरेदी-विक्रीचा व्यवहार करते. तसंच म्युच्युअल फंड ट्रान्झाक्शनसाठी एक प्लॅटफॉम उपलब्ध करुन देते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com