esakal | UP उन्नाव : 82 प्रवाशांना घेऊन जाणारी बस पलटली, 20 जण गंभीर जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

 UP bus accident

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

UP उन्नाव : 82 प्रवाशांना घेऊन जाणारी बस पलटली, 20 जण गंभीर जखमी

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

उत्तर प्रदेशमधील उनाव जिल्ह्यातील सिरधरपूर गावाजवळ शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये बसमधील 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. 82 प्रवाशांना घेऊन ही बस दिल्लीहून उत्तर प्रदेशमधील बहराइच जिल्ह्याच्या दिशेने जात होती. एका वळणावर बसने पलटी घेतली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 20 जण गंभीर जखमी झाले असून अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 

loading image
go to top