जम्मू-काश्मीरमध्ये बस कोसळली दरीत; 7 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
Thursday, 2 January 2020

जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये एक भीषण दुर्घटना घडली. या परिसरात बस दरीत कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला. तर यामध्ये 15 हून अधिक जण जखमी झाले.

नौशेरा : जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये एक भीषण दुर्घटना घडली. या परिसरात बस दरीत कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला. तर यामध्ये 15 हून अधिक जण जखमी झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नौशेराच्या लंबेरीनजीक ही घटना घडली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह आढळले आहेत. यामध्ये 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे यातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. 

या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य सुरु केले जात असून, यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus collapse in Nowshera Jammu and Kashmir 7 peoples died

Tags
टॉपिकस
Topic Tags: