esakal | 'यूपी'त स्पर्धेसाठी गेलेली महाराष्ट्रातील मुले थोडक्यात बचावली; चालकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

dead body

प्रतापगढमधील जेठवारा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नारायणपूर येथील नवोदय विद्यालयात महाराष्ट्रातून विद्यार्थी ज्युदो-कराटे स्पर्धेसाठी आले आहेत. शनिवारी मध्यरात्री या मुलांना घेऊन बस विद्यालयात पोहचली. मुलांना बसमधून उतरविण्यात आले.

'यूपी'त स्पर्धेसाठी गेलेली महाराष्ट्रातील मुले थोडक्यात बचावली; चालकाचा मृत्यू

sakal_logo
By
पी. बी. सिंग

प्रतापगढ : उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील जेठवारा येथे स्पर्धेसाठी आलेल्या महाराष्ट्रातील मुलांच्या बसचा मोठा अपघात टळला असून, मुलांना स्पर्धेसाठी सोडून जाताना बसचा हायव्होल्टेज विद्युत तारेला स्पर्श झाल्याने चालकाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापगढमधील जेठवारा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नारायणपूर येथील नवोदय विद्यालयात महाराष्ट्रातून विद्यार्थी ज्युदो-कराटे स्पर्धेसाठी आले आहेत. शनिवारी मध्यरात्री या मुलांना घेऊन बस विद्यालयात पोहचली. मुलांना बसमधून उतरविण्यात आले. त्यावेळी बस मागे घेताना विद्युत तारेला बसचा धक्का लागला. या दुर्घटनेत बस चालक अशोक धोत्रे (वय 35) यांचा जागीच मृत्यू झाला. 

या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, जेठवारा पोलिस ठाण्याचे प्रमुख विनोदकुमार यादव यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठविला आहे. नारायणपूरमध्ये 26 ते 28 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.

loading image
go to top