Bus Accident: ओव्हरटेक करताना भीषण अपघात; ४० जणांना घेऊन जाणारी बस झाली पलटी, 21 पोलीस जखमी

Bus Accident: या अपघातात होमगार्डसह 21 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी माहिती मिळताच जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Bus Accident
Bus AccidentEsakal

नागपूर-भोपाळ महामार्गावरील बरेठा घाटाजवळ आज (शनिवारी) सकाळी होमगार्ड आणि पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 21 जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटे चारच्या सुमारास ट्रकला ओव्हरटेक केल्याने हा अपघात झाला आहे.

छिंदवाडा येथून ड्युटी संपवून सैनिकांनी भरलेली बस बरेठा घाटावर आली तेव्हा ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या बसला धडकली. धडकेनंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Bus Accident
Video: 'आपण पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानमध्ये राहतो का?'; बेंगळुरुमध्ये अभिनेत्री आणि पतीवर हल्ला

छिंदवाडाहून राजगढला जाणाऱ्या या बसमध्ये ४० जण होते, ज्यात ३४ होमगार्ड शिपाई आणि ६ पोलीस होते. अपघातात 21 जण जखमी झाले असून 12 जणांना किरकोळ जखमींना आरोग्य केंद्र शाहपूर येथे दाखल करण्यात आले असून 9 गंभीर जखमी जवानांना जिल्हा रुग्णालयात बैतुल येथे दाखल करण्यात आले आहे.

Bus Accident
Odisha Boat Capsizes: ओडिशातील झारसुगुडा येथे भीषण दुर्घटना; महानदीत बोट उलटल्याने महिलेचा मृत्यू, सात जण बेपत्ता

बसमध्ये प्रवास करणारे पोलीस शिपाई अशोक कुमार कौरव यांनी सांगितले की, आम्ही निवडणूक ड्युटी करून परतत होतो, आमच्यासोबत 34 होमगार्ड आणि 6 पोलीस बसमध्ये प्रवास करत होते. वाटेत चहा पिऊन आम्ही राजगडच्या दिशेने निघालो तेव्हा बरेठा घाटात ट्रकला धडकल्यानंतर बस खड्ड्यात पलटी झाली.

Bus Accident
Arvind Kejriwal News : जामिनासाठी मी लकवा मारून घेण्याचा धोका पत्करेन का? केजरीवाल यांचा कोर्टासमोर सवाल

एसडीओपी बैतुल शालिनी परस्ते यांनी सांगितले की, हा अपघात शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा तपास करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com